
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या मंजूर
बातमी थोडक्यात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र पवार यांनी मंजूर केल्या. जिल्हाध्यक्षांनी शहर सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष अशा २५ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला. प्रा. जयंत शिंदे यांची शहर सरचिटणीस, तर काशिनाथ जगताप यांची उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.