
कोल्हापूर: सहकारनगरमध्ये कुटुंबावर वार
बातमी थोडक्यात
सहकारनगर साईट नं. १०२ मध्ये झालेल्या हिंसक हल्ल्यात गौरव गणेश बागडे यांच्यासह कुटुंबातील चार जण जखमी झाले. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याने वार केले. गणेश बागडे व हल्लेखोरांमध्ये आर्थिक वाद असल्याचं बोललं जात आहे. नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने हल्लेखोर पळून गेले. गावभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सुरू होती.