
गोकुळ सरकारी संचालक पदासाठी चार निवृत्त बँकर्सची चर्चा
बातमी थोडक्यात
गोकुळमध्ये सरकारी नियुक्त संचालक पदासाठी निवृत्त बँक अधिकारी शिवाजीराव अडनाईक, के. डी. पाटील, डॉ. प्रवीण हेंद्रे आणि ॲड. प्रकाश पाटोळे यांच्यावर चर्चा सुरू आहे. राजकीय नियुक्त्यांपेक्षा बँकिंग, अकाउंटिंग आणि कायद्यातील तज्ज्ञांना प्राधान्य देण्याचा महायुतीचा मानस आहे. आता या संदर्भातील अधिकृत घोषणेवर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नजर आहे.