
यमुनाकाठ 2026 दिवाळी अंक दिल्लीत प्रकाशित
बातमी थोडक्यात
'यमुनाकाठ 2026' या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन दिल्लीत झाले. या विशेषांकात मराठी समाजाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक प्रतिबिंबावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात दिल्लीस्थित मराठी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते. या विशेषांकात साहित्य, राजकारण, प्रशासन, माध्यम, कायदा, धोरणनिर्मिती, संशोधन, लेखन, समाजकार्य, छायाचित्रण आणि शिल्पकला या क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती आणि लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.