
मुंबई सेंट्रलजवळ भांडणात प्रवाशाला फेकले ट्रेनमधून
बातमी थोडक्यात
लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमधील वाद विकोपाला गेला आणि हाणामारी झाली. यात एका व्यक्तीला मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ धावत्या ट्रेनमधून फेकले गेले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि लोकल ट्रेनच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.