
दिवाळीच्या पूर्वसंध्येला रामबाग परिवारावर कोसळले दु:ख
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या पूर्वसंध्येला श्री स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जात असताना कल्याणच्या रामबाग परिसरातील एका परिवाराला कंटेनरची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. भारंबे परिवाराच्या घरात दिवाळीची तयारी सुरू असतानाच चार जणांचा मृत्यू आणि वडिलांना गंभीर दुखापत झाल्याने दु:खाचे पडसाद उमटले आहेत. दिवाळीच्या दिव्यांनी उजळून निघालेला परिसर अंधारात बुडाला आहे.