
नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून मदत निधीसाठी २ लाख ४१ हजार रुपये जमा
बातमी थोडक्यात
नाशिक जिल्ह्यातील सक्रिय निवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचार्यांकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी २ लाख ४१ हजार रुपये जमा करण्यात आले. महाराष्ट्रातील कृतीशील संस्थेच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री मदत निधी संकलनात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. धनत्रयोदशीच्या दिवशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.