
ओझरखेड धरणावळीत बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणार
बातमी थोडक्यात
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणावळीत भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकात २१ फूट उंचीचा धनुष्यधारी पुतळा उभारण्यात येणार आहे. चार कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेला हा प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. या स्मारकामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून दहा एकरपेक्षा जास्त जागेत वनराईही करण्यात येणार आहे.