
अरूण लाल यांना पुण्यात तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार मिळणार
बातमी थोडक्यात
केरळमधील रंगकर्मी अरूण लाल यांना पुण्यात तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार मिळणार आहे. रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात एक स्मृतिचिन्ह आणि ७५ हजार रुपये दिले जातात. २५ वर्षांपासून रंगभूमीवर सक्रिय असलेले लाल यांचा १६ नोव्हेंबर रोजी एका समारंभात गौरव केला जाणार आहे.