
पुण्यातील दिवाळी पहाट मैफिलीत प्रख्यात मृदंगवादकाचे निधन
बातमी थोडक्यात
पुण्यातील बाणेर येथे दिवाळी पहाट मैफिलीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने श्रीधर पार्थसारथी मंचावर कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय प्रयत्नांनंतरही त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोक व्यक्त होत असून गायक शंकर महादेवन यांनी हे अपूरणीय नुकसान असल्याचे म्हटले आहे.