
जालना: ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांना कर्जमाफी
बातमी थोडक्यात
जालना जिल्ह्यातील ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी एकूण १ हजार १११. ७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. महाआयटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या रकमेच्या जमापोटी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.