
श्रीरामपूर : ऊस कामगारांसाठी दिवाळी भेटवस्तू
बातमी थोडक्यात
अँकर असोसिएशन, श्रीरामपूर आणि सोशल सर्व्हिस फाऊंडेशनच्या वतीने अशोकनगर आणि निपाणी वडगाव येथील ऊस कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने खाऊ आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील सर्व घटकांना सणासुदीचा आनंद घेता यावा यासाठी प्रा. ॲड. आदिनाथ जोशी यांनी पुढाकार घेतला असून सलीम खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या भागातील ऊस कामगारांना दिवाळीच्या वस्तूंचे वाटप करून आनंद देण्यात आला.