
५१ वा पार्वती दीपोत्सव परिसरात उजळला
बातमी थोडक्यात
शुक्रवारी पहाटे ५ वाजता ५१ वा पार्वती दीपोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत हजारो दिव्यांनी पार्वती परिसर उजळून निघाला. पुणेकरांच्या व विविध गटांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संतोष सकपाळ, विकास सावंत व इतरांच्या समन्वयाने पार्वतीच्या सर्व पायऱ्यांवर व अनेक मंदिरांमध्ये दिवे लावण्यात आले. विठ्ठल-राखुमाई मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. पार्वतीत नियमित येणाऱ्या ज्येष्ठ पुणेकरांचा सत्कार करण्यासाठी ५० हून अधिक महिला रंगीबेरंगी साड्यांनिशी दाखल झाल्या होत्या.