
गोकुळ डेअरी: सरकारकडून नियुक्त्यांसाठी मार्ग मोकळा
बातमी थोडक्यात
महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर 'गोकुळ'मध्ये शासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला कोंडीत पकडून 'गोकुळ'वर ताबा मिळविण्याचा यामागे हेतू आहे. नियुक्तीसाठी सहकार विभागाकडून स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.