
१२ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले असते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.
बातमी थोडक्यात
अजितदादा हयात असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट १२ फेब्रुवारीलाच विलीन झाले असते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. अजित पवारांच्या हयातीत विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. विलीनीकरणाची प्रक्रिया अजितदादांनी सांगितली होती. २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाल्याने विलीनीकरण होऊ शकले नाही. दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही हालचाल होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. १० तारखेनंतर होणाऱ्या चर्चेतून विलीनीकरणाचे भवितव्य ठरू शकते.