
दुष्काळात पुणे महाप्रवास फेरविचारण्याची मागणी मोहन जोशी यांची
बातमी थोडक्यात
दुष्काळात पुणे जिल्ह्यात महाप्रवास सायकल शर्यत आयोजित करू नये, अशी मागणी माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. दुष्काळात शर्यत आयोजित केल्यास नागरिकांच्या मूलभूत गरजा व सार्वजनिक निधीचे वाटप यावर परिणाम होऊ शकतो. पुणे जिल्ह्याला शर्यतीचा किती फायदा झाला व त्यासाठी प्रस्तावित खर्चाचा तपशील जनतेसमोर मांडण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली.