
अजित पवारांनी राष्ट्रवादीचे दोन गट विलीन केले असते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.
बातमी थोडक्यात
अजित पवार जिवंत असते तर राष्ट्रवादीचे दोन गट विलीन केले असते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला. राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र करण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याने ही प्रक्रिया थांबली होती, असे तटकरे यांनी नमूद केले.