
अग्निवीरांच्या सेवेचा कार्यकाळ चालू युनिटसाठी वाढवला
बातमी थोडक्यात
अग्निवीरांच्या सध्या सेवेत असलेल्या नऊ युनिटसाठीच आता अग्निवीर योजनेत बदल लागू होत असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवण्यात आला आहे. प्रत्येक युनिटमधील उर्वरित ७५ टक्के जवानांना आता दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात येणार आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते नियमित सेवेत रुजू होऊ शकतील.