
मुंबई उच्च न्यायालयाकडून पेन बँकेच्या ठेवीदारांना परतफेड करण्याचा मार्ग मोकळा
बातमी थोडक्यात
मुंबई उच्च न्यायालयाने ठेवी विमा आणि पत हमी महामंडळाचा आक्षेप फेटाळून लावत मध्यम आणि मोठ्या ४२ हजार ४८२ ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या १० टक्के रक्कम किंवा १ लाख रुपये परतफेड करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे २५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्यांना दिलासा मिळणार आहे, तर १ लाख १५ हजार लहान ठेवीदारांना २६ कोटी ९४ लाख रुपये परतफेड करण्यात आले आहेत.