
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन
बातमी थोडक्यात
मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या जागी पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले. दापोडी-निगडी रोड ते पिंपरी गाव या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता विलंब टाळता येणार असून, वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होणार आहे.