
भाववाढीमुळे पुणे बंगळूर महामार्गावर शेतकऱ्यांचा चक्का जाम
बातमी थोडक्यात
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे बंगळूर महामार्गावर चक्का जाम केल्याने जिल्ह्यात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली असून दिवाळीच्या तोंडावर नागरिक अडकून पडले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना उसाला ४५०० रुपये प्रति टन मिळावे या मागणीसाठी नागठण येथे तीन दिवसांचा चक्का जाम करत आहे. खिंडवाडी ते लिंबखिंडी या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.