
नेतन्याहू यांचे अल्पमत; ऑर्थोडॉक्स पक्षाने पाठिंबा मागे घेतला
बातमी थोडक्यात
इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या सत्तासंघर्षामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची राजकीय स्थिती कमकुवत झाली आहे. अति-ऑर्थोडॉक्स ज्यू मतदारांचे प्रतिनिधित्व करणार्या युनायटेड तोराह ज्युडाईझम पक्षाने सरकार स्थापनेसाठी कोणत्याही नेत्याला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. राजकीय पेचाचा परिणाम इस्रायलमधील सरकार स्थापनेवर झाला आहे.