
पुण्यातील प्रवाशाकडून हायड्रोपोनिक गांजा जप्त
बातमी थोडक्यात
पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या सामान तपासणी दरम्यान अन्नाच्या पाकिटात लपवलेला ३ कोटी ७२ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची कसून तपासणी केली असता तस्करीची अनोखी पद्धत उघडकीस आली. प्रवाशाची १८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी झाली आहे.