
पुणे: सासर्यांच्या रिक्षाला आग लावल्याप्रकरणी जावयाला अटक
बातमी थोडक्यात
कॅनाल रोडवरील शांतीनगर वसाहतीत सासर्यांच्या रिक्षाला आग लावल्याप्रकरणी प्रशांत शिवशरण या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. यापूर्वीही याने चोरी तसेच महिलांविरुद्ध गुन्हे केले आहेत. कॅनाल रोडच्या कडेला लावलेल्या या रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार रमेश गायकवाड पुढील तपास करत आहेत.