
एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस
बातमी थोडक्यात
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांची सानुग्रह रक्कम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत जाहीर केली. लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास सेवा देण्यासाठी एसटीचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करतात. या निर्णयामुळे महामंडळावर 160 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.