
दिवाळीनंतर नांदेडला 7 दिवसांचा पाणीपुरवठा
बातमी थोडक्यात
दिवाळीनंतर दर 7 दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची योजना जिल्हा प्रशासनाने आखल्याने नांदेड शहरातील नागरिकांना उन्हाळ्यापूर्वीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईच्या शक्यतेमुळे नागरिक आधीच पाणी साठवणुकीची साधने तयार करत आहेत. अत्यंत कमी पाऊस आणि घटते भूजल पातळी यामुळे ही योजना आखण्यात आली आहे.