
दिवाळीच्या आधी 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांना सरकारकडून 4 हजार 764 कोटी रुपयांची कर्जमाफी
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांसह 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांना सरकारकडून 4 हजार 764 कोटी रुपयांची कर्जमाफी. राज्याचा 85 टक्के भाग दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर ही रक्कम देण्यात आली आहे. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांना पुढील दोन दिवसांत ही रक्कम मिळणार आहे.