
पीएम मोदी गुजरात दौरा : स्ट्रीट लाईट बंद, लिपिक निलंबित
बातमी थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यात डभोई नगरपालिकेच्या मार्गावर १२ पथदिवे बंद असल्याने दौऱ्यात व्यत्यय आला. पथदिवे बंद ठेवल्याबद्दल प्रकाश विभागाचे प्रभारी लिपिक महेश वसावा यांना निलंबित करण्यात आले. वसावा यांना ६ नोव्हेंबर रोजी सक्षम प्राधिकरणासमोर हजर राहून वैयक्तिक सुनावणी होणार आहे.