
शून्य कापूस आयात शुल्क रद्द करा, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शेतकरी क्रांतिकारी संघटनेचा आंदोलन
बातमी थोडक्यात
शून्य टक्के कापूस आयात शुल्क रद्द करा आणि शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी क्रांतिकारी संघटनेने भांडेगाव येथे आंदोलन केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात धोरणामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यावर तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.