
गोकुळात पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती
बातमी थोडक्यात
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती होणार असून, त्यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावर समविचारी आघाडीचा दावा कमकुवत झाला आहे. १० नोव्हेंबर रोजी बैठक बोलावण्यासाठी तातडीने नोटीस काढण्यात येणार आहे.