
ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण अधिकारी यांनी जनजागृतीचे आवाहन केले
बातमी थोडक्यात
ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन शिक्षण अधिकारी रतनसिंग पवार यांनी निवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात केले. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यक्रमात घटलेली विद्यार्थ्यांची संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. निवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी पेन्शनर अदालत तातडीने लागू करण्यात येणार आहे.