
कालिका माता मंदिराच्या जवळ पाच तासांनी आगीवर नियंत्रण
बातमी थोडक्यात
दौलताबाद घाट परिसरात बुधवार दुपारी तीन वाजता कालिका माता मंदिराच्या जवळ वणवा पेटला. सुकलेल्या गवतामुळे व जोरदार वाऱ्यामुळे वणवा वेगाने पसरला. पाच तासांनी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचार्यांना मदत करून आग आटोक्यात आणली. वणव्याने माळीवाडा वनक्षेत्र व गायण या भागाला वेढले असून मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे.