
नागठण शेतकरी आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प
बातमी थोडक्यात
नागठण येथील शेतकरी आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर तब्बल २४ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. हजारो वाहनचालक रस्त्यात अडकून पडले होते. वाहनांच्या मालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ट्रक चालकांनी रस्त्यावरच गाड्यांमध्ये स्वयंपाक केला. या आंदोलनामुळे महामार्गावर काही ठिकाणी वाहनेच नसल्याचे दुर्मिळ दृश्य निर्माण झाले होते.