
अहिल्यानगर : शिवसेना चिन्हाचा वाद जनतेनेच ठरवायचा
बातमी थोडक्यात
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर शिवसेनेच्या चिन्हाच्या वादाचा निकाल 'पीपल्स कोर्ट'मध्ये जनताच ठरवेल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. अहिल्यानगरमधील जनतेला राजकीय वास्तवाचे भान आहे आणि त्यांनी पैशाने आमदार खरेदी करण्याचे राजकारण पाहिले आहे. शिवसेनेच्या बाजूने दिवाळीनंतर युक्तिवाद मांडले जातील.