
सह्याद्रीच्या विरोधात भाजपचे टोरंटो पॉवरशी युतीवर प्रकाश आंबेडकर यांची टीका
बातमी थोडक्यात
टोरंटो पॉवरकडून निधी घेणारे राजकीय पक्ष कंपनीच्या बाजूने आहेत की सह्याद्री वाचवण्यासाठी लढणाऱ्या स्थानिक लोकांच्या बाजूने, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. लाभार्थी पक्षांचे नेते कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत असल्याचा आव आणत आहेत. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यासह लाभार्थी पक्षांच्या नेत्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी.