
मार्चपर्यंत पंपला १०० टक्के दिवसाचा वीज पुरवठा करण्याचे राज्याचे उद्दिष्ट
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० द्वारे मार्च अखेरपर्यंत राज्यातील कृषी पंपांना १०० टक्के दिवसाचा वीज पुरवठा करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील ८० टक्के कृषी पंपांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाचा वीज पुरवठा सुरू झाला आहे. मार्च अखेरपर्यंत उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास लोकेश चंद्रा यांनी व्यक्त केला.