थेरगावच्या यशवंतराव चव्हाण शाळेत शून्य कचरा प्रकल्प सुरू
बातमी थोडक्यात
थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते 'स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा' या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. शाळेच्या आवारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन 'शून्य कचरा मॉनिटर' या संकल्पनेतून करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. थेरगाव येथे हा प्रकल्प पथदर्शी म्हणून राबविला जात असून, यशामुळे इतर शाळांमध्येही हा प्रकल्प राबविण्याची योजना आहे.