
पुराच्या तडाख्यात यवतमाळकरांना ३० कोटींचा दिलासा
बातमी थोडक्यात
जून ते ऑगस्ट या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे २ लाख ६८ हजार ९१८. २९ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून ३ लाख ९ हजार २८९ शेतकरी बाधित झाले आहेत. राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना २६२ कोटी ६९ लाख रुपये मंजूर केले असून यवतमाळ जिल्ह्यासाठी ३० कोटी २ लाख ७ हजार रुपये मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत. वितरणासाठी लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.