
पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड स्ट्रीट वेंडर्ससाठी
बातमी थोडक्यात
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पात्र फेरीवाल्यांना ३० हजार रुपयांपर्यंतच्या क्रेडिट लिमिटसह रुपे क्रेडिट कार्ड मिळत आहे. फेरीवाले आता रोख रकमेची गरज नसताना क्रेडिट लिमिट वापरून डिजिटल पेमेंट करू शकतात. २१ ते ६५ वयोगटातील आणि एनपीए नसलेले अर्जदार क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.