
मालवण-दांडीत गोवा दारूच्या ८० पेट्या जप्त
बातमी थोडक्यात
मालवण-दांडीत पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई करत गोवा दारूच्या ५ लाख ३८ हजार रुपयांच्या ८० पेट्या जप्त केल्या. अवैध विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कारवाईने परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांना हादरवून सोडले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.