
दुष्काळाचा सामना करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील १२ हेक्टरमध्ये चारा लागवड
बातमी थोडक्यात
मोर्शी तालुक्यातील १२ हेक्टर खाऱ्या जमिनीत चारा लागवड सुरू झाली असून दोन महिन्यात ती तयार होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केला आहे. दापोरी, वाघोळी, घोडेव या भागातील ३०० मेट्रिक टन चारा तयार करून दुष्काळ निवारण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मनरेगाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घयारे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण सराडे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. मोर्शी तालुक्यातील जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. कापणीनंतर उपलब्ध पाण्यावर पुन्हा चारा तयार केला जाणार आहे.