
अमरावती येथे खो-खो स्पर्धेला प्रारंभ
बातमी थोडक्यात
अमरावती येथे आजपासून मराठा फ्रेंड्स क्लब मैदानावर दोन दिवस विभागीय स्तरावरील शालेय खो-खो स्पर्धेला प्रारंभ होत आहे. यात १४ वर्षांखालील पाच जिल्ह्यांतील मुले व मुली भाग घेणार आहेत. यात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील संघ सहभागी होत आहेत. खेळाडूंना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा फ्रेंड्स क्लबने केले आहे.