
दिवाळी नंतर पुण्याला दर दुसऱ्या दिवशी पाणी कपात
बातमी थोडक्यात
पुणे शहरात दिवाळी नंतर पाणी कपात होणार आहे. शहरात 'दर दुसऱ्या दिवशी' पाणी पुरवठा योजना लागू करण्यात आली आहे. एल निनोचा परिणाम आणि पावसाच्या मोठ्या कमतरतेमुळे राज्य सरकारने २० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. वाढती लोकसंख्या आणि दैनंदिन गरजांमुळे उरलेला पाणीसाठा अत्यंत अपुरा असणार आहे.