
सालेगाव मध्ये अनधिकृत आरोग्य शिबिर बंद
बातमी थोडक्यात
सालेगाव येथील हनुमान मंदिरात उमेद एक नवी किरण आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्पर्श हेल्थ केअर या संस्थेच्या वतीने अनधिकृत आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते. आयोजकांकडे आवश्यक वैद्यकीय परवानग्या नसल्याचे आढळून आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिर बंद पाडले. डॉ. शिला कांबळे यांनी आयोजकांकडून कागदपत्रे मागितली. या घटनेवरून आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात आली.