
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे १० नोव्हेंबर रोजी दीपोत्सव
बातमी थोडक्यात
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे १० नोव्हेंबर २०२६ रोजी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात इको फ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा, रंगावली कला प्रदर्शन, सुगम संगीत, पालखी वंदन, दीप प्रज्वलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दिवाळी पाडव्याच्या रात्री कुणकेश्वर समुद्रकिनारा हजारो दिव्यांनी उजळून निघणार आहे. सहभागींनी ९ नोव्हेंबरपर्यंत आकाशकंदील सादर करावेत.