
पुणे मेट्रो लाईन-3 ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार
बातमी थोडक्यात
पुणे मेट्रो लाईन-3 ४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून दर ६ मिनिटांनी पीक सेवा आणि दर १२ मिनिटांनी नियमित सेवा सुरु होणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी पीएम मोदी यांच्या ऑनलाईन उद्घाटनानंतर सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो सुटेल. या मार्गामुळे हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, औंध, शिवाजीनगरमधील वाहतूक कोंडी कमी होणार असून दररोज दोन ते अडीच लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत दोन तर जानेवारी २०२७ पर्यंत चार स्थानकांचे काम होणार आहे.