
पिंपरी-चिंचवडच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप, सर्वपक्षीय आंदोलन
बातमी थोडक्यात
पिंपरी-चिंचवडमधील महापालिका अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि अकार्यक्षमतेचे आरोप, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना नेते प्रशासनाच्या विरोधात एकवटले. शुक्रवारी झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी कामकाजाचा निषेध केला, चर्चा दरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सभागृहातून बाहेर पडले. अधिकाऱ्यांच्या गैरप्रकारांमुळे शहराची प्रतिमा डागाळली गेली असून, दररोज भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणे समोर येत आहेत.