
जालना सौर प्रकल्पात पाच दिवस वीजपुरवठा खंडित
बातमी थोडक्यात
ल्युमिना क्लीन एनर्जीच्या तलनी येथील ५ मेगावॅट सौर प्रकल्पातील इन्सुलेशन किट जळाल्याने ३३ केव्ही सेंटरमध्ये वीज बंद पडली. तलनी, पूर्णा, देवठाणा गावांना याचा फटका बसला. दुष्काळसदृश परिस्थितीत रब्बी पिकांच्या सिंचनासह जनावरांच्या चारा नियोजनासाठी शेतकरी धडपडत आहेत. दुरुस्तीची जबाबदारी प्रकल्प व्यवस्थापनाकडे आहे.