
रिलायन्स, ब्लिंकीट, झोमॅटो कडून ५.१४ कोटी रुपयांचा अन्नसाठा एफडीएकडून जप्त
बातमी थोडक्यात
ठाणे, नवी मुंबई, पुणे येथील रिलायन्स, ब्लिंकीट, झोमॅटोच्या गोदामांवर एफडीएची धाड, ५.१४ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त. एक्सपायर, खराब झालेले पदार्थ सापडले, सहा परवाना निलंबित. भिवंडी, तुर्भे आदी भागांवर कारवाई, ब्लिंक कॉमर्स, क्लाउडस्टोअर रिटेल विरोधात पोलिसात गुन्हे दाखल.