
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा सदावर्त्यांचा
बातमी थोडक्यात
शिंदे सेनेच्या संकरित राजकारणावर टीका करत, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा 'अलिबी' निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत सदावर्त्यांनी राज्यात सर्वसमावेशक शासनाची मागणी केली.